Strict action will be taken against drunk drivers during Holi
चंद्रपूर :- दिनांक 13 व 14 मार्च रोजी होळी व धुलीवंदन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याउत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण होते. तसेच ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते.
या कालावधीत काही अतिउत्साही तरूणमंडळी मद्यप्राशन करून दुचाकी / चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश ड्रायव्हिंग, (Rash Driving) स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभिर अपघात घडुन जिवितहानी होत असते. Strict action will be taken against drunk drivers
त्याच्या अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने दिनांक 13 मार्च 2025 ते दि.14 मार्च 2025 या कालावधीत संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ठिक ठिकाणी चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकेबंदी लावण्यात येणार आहे. चंद्रपुरात अग्नीशस्त्र व जिवंत काडतूस जप्त
तरी याकाळात कोणीही मद्यप्राशन करून वाहन चालविणार नाही. जर मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळुन आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. Chandrapur District Police
जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा Traffic Control Branch चंद्रपुर व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह ची विशेष मोहीम घेवुन कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. Drunk & Drive Special Campaign
तरी होळी व धुलीवंदन साजरा करतांना वाहन धारकांच्या चुकीमुळे निष्पाप नागरीकांचा बळी जावुन होळीच्या रंगाचा बेरंग होवु नये’ याकरीता वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे चंद्रपुर पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे.