Saturday, January 17, 2026
HomeBussinessचंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाट तात्काळ सुरु करा

चंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाट तात्काळ सुरु करा

Start sand ghat in Chandrapur district immediately : Aam Aadmi Party demand

चंद्रपूर : जिल्ह्यातील रेती घाट तात्काळ सुरु करून घरकुल लाभार्थ्यांना न्याय दिला जावा, तसेच अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. Start sand ghat in Chandrapur district

AAP आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांनी सांगितले की, “जिल्ह्यात रेती घाट तात्काळ सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे, विशेषत: घरकुल लाभार्थ्यांसाठी जे आपल्या घरांच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली रेती मिळवण्यात अडचणीत आले आहेत. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळण्यास विलंब होतो आहे. या समस्येचा त्वरित निवारण होणे आवश्यक आहे.”

तसेच, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असून, त्याचे पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम गंभीर होत आहेत. प्रशासनाने अवैध उत्खननावर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी, टेकनॉलॉजीचा वापर करून ड्रोन किंवा सोलर CCTV कॅमेरे लावून यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असे श्री. कुडे यांनी सांगितले.

“जर प्रशासनाने त्वरित उपाययोजना केली नाही आणि अवैध रेती उत्खनन रोखले नाही, तर आम आदमी पार्टी स्वतः मोहीम राबवेल आणि अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी आंदोलन उभारेल,” असे राजु कुडे यांनी स्पष्ट केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular