Scavengers should be given the benefit of government decision
The demand of the All India Sweepers Congress Association
चंद्रपूर :- अखिल भारतीय सफाई कामगार कांग्रेस संघटने चे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत व विविध शासकीय कार्यालयात साफसफाईची कामे करणाऱ्या कुली, रेजा, जमादार व इतर पदांवर शासनाने जागा मंजूर केल्या असुन त्यांना तातडीने न्याय देण्याची मागणी श्रमिक भवनातील आयोजित पत्रपरिषदेत केली आहे. Scavengers should be given the benefit of government decision
24 फेब्रुवारी 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न करून चुकीच्या ठिकाणी मार्गदर्शन पत्र दाखवून आयुक्त व उपायुक्तांची दिशाभूल केली जात असल्याचे संघटने चे राष्ट्रीय अध्यक्ष परमार यांनी सांगितले.
या शासन निर्णयात स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे की, त्या व्यक्तीकडे कोणतेही पद असले तरी ती सफाईचे काम करत असेल आणि त्या कर्मचाऱ्याला बढती मिळाली नसेल, तर त्याच्या वारसांना नोकरी देण्याची तरतूद या शासन निर्णयात करण्यात आली आहे. मात्र यासोबतच चंद्रपूर महानगरपालिका, जिल्हा नगर पंचायत व जिल्ह्यातील सर्वच विभागातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदार नोकऱ्यांचे प्रकरण त्वरित निपटावे, जे महिला, पुरूष आणि युवक, युवती सफाई चे काम करत होते त्यांना ठेकेदार ने कामावरून कमी केले आहे व अन्य लोकांना कामवर नियुक्त केल्याने या समाजावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
वरोरा येथील सफाई कामगार एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व जुन्या सफाई कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे, जिल्ह्यातील लोकसंख्येच्या आधारे स्वच्छता कर्मचाऱ्यांची नवीन भरती करण्यात यावी व बाल्मिकी सुदर्शन समाजाचे वारसदार असलेल्यांना अशा स्वच्छतेची कामाचे प्राथमिकता देण्यात यावी,
जे कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत त्यांना शैक्षणिक पात्रतेच्या आधारे पदोन्नतीचा लाभ द्यावा, सफाई काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना जमीन आणि कायमस्वरूपी घरे देण्यात यावीत, कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या काही स्वच्छता कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परीषदेला अखिल भारतीय सफाई कर्मचारी कांग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार, प्रदेश सचिव विक्की बडेल, प्रदेश कार्याध्यक्ष घनश्याम डका, सुदर्शन समाजाचे प्रदेश महासचिव मनोज खोटे, प्रदेश संघटन मंत्री राजेश रेवते, प्रदेश सल्लागार राजेश उसरे, प्रदेश सचिव डॉ. गिरीश शुक्ला, राजू राठोड, रेखा गौतम, सीमा नन्हेंट, आरती लंगोट, माधुरी बिरिया, संजय बिरिया यांच्यासह सुदर्शन समाजाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.