Rajura police solves robbery case in four hours
चंद्रपूर :- राजुरा शहर पोलिसांनी केवळ चार तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत चार आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी रोख ४२,३०० रुपये आणि दुचाकी मिळून एकूण १,१२,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत कट रचणाऱ्या वाहन चालकासह चौघांना अटक करण्यात आली. Rajura police solves robbery case in four hours सोने विक्री करताना घरफोडीच्या आरोपींना अटक
मार्केटिंग चे काम करणारे हंसराज दिघाडे रा. तुकूम, चंद्रपूर हे दिनांक 24 सप्टेंबर रोजी गडचांदूर वरून चारचाकी वाहनाने ड्रायव्हर सोबत वसुली करून रक्कम घेऊन राजुरा हायवे मार्गाने चंद्रपूर येत असताना 3 अनोळखी व्यक्तींनी हायवेवर अडवून लोखंडी रॉडने धमकावून ९३ हजार रुपये लुटले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. Robbery Crime
राजुरा पोलिसांनी तपास सुरू करीत संशयित वाहन चालकाला ताब्यात घेऊन त्याची पोलिसी खाक्या दाखवित चौकशी केली असता वाहन चालकानेच साथीदारांसह कट रचल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपी सौरभ निलेवार (23), जाकीर शेख (25), अरबाज शेख (24) आणि मुजाहिद शेख (26) सर्व रा. चंद्रपूर यांना अटक करण्यात आली गुन्ह्यात जबरी चोरी केलेली 42300 रुपये गुन्ह्यात वापरलेली चारचाकी 70,000 रुपये असा एकूण 1,12,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमीत परतेकी यांच्या नेतृत्वात सपोनि हेमंत पवार, पोउपनि दिपक ठाकरे, सफो किशोर तुमरम, पोहवा विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, महेश बोलगोडवार, शफीक शेख, आनंद मोरे, बालाजी यामजवार, शरद राठोड, राजू दुबे आदी राजुरा पोलीस स्टेशन यांनी केली.