Restrictions within 100 meters during NEET exam
चंद्रपूर :- भारत सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) या स्वायत्त संस्थेमार्फत नीट (युजी) ही परीक्षा चंद्रपूर जिल्ह्यातील 9 परीक्षा केंद्रावर 4 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीकोनातून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 10 ते सायं 7 वाजेपर्यंत प्रतिबंध लावण्यासंदर्भात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जारी केले आहे. Restrictions within 100 meters during NEET exam
असे आहेत निर्बंध : 1) दि. 4 मे 2025 रोजी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरात सकाळी 10 ते सायं 7 वाजेपर्यंत परीक्षार्थी व्यतिरीक्त 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत. 2) केंद्राच्या परिसरांतर्गत / क्षेत्रातंर्गत सकाळी 10 ते सायं 7 वाजेपर्यंत नियमीत व रोजच्या वाहतूकीव्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. 3) 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी. बुथ, पेजर, मोबाईलफोन, ई-मेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कॉम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.
सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित परीक्षा केंद्रावर दिनांक 4 मे रोजी सकाळी 10 ते सायं 7 वाजेपर्यंत अंमलात राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधित व्यक्ती वा इसम प्रचलित कायदयातील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
हे आहेत परीक्षा केंद्र : चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 3619 विद्यार्थी नीटची परिक्षा देणार असून त्यासाठी जिल्ह्यात 9 परीक्षा केंद्राचे आयोजन करण्यात आाले आहे. यात 1) केंद्रीय विदयालय डब्लुसीएल कॉलनी, शक्ती नगर, दुर्गापूर सी.टि.पी. एस चंद्रपूर 2) पी.एम. श्री. के. व्ही ऑफ चांदा, ओ.एफ इस्टेट भद्रावती जि. चंद्रपूर 3) गव्हरमेन्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, चंद्रपूर 4) डॉ. आंबेडकर कॉलेज आफॅ आर्ट, कॉर्मर्स सायन्स, चंद्रपूर 5) नारायण विदयालय, खुटाळा, घुग्गुस रोड, पडोली चंद्रपूर 6) इंदिरा गांधी गार्डन स्कुल, राजीव गांधी मार्ग, दाताळा रोड, चंद्रपूर 7) महर्षी विदया मंदीर, 72/4 मौजा दाताळा, दाताळा रोड, चंद्रपूर 8) माउंट कार्मल कॉन्व्हेंट हायस्कुल, शास्त्री नगर, चंद्रपूर 9) राजीव गांधी, इंजीनिअरिंग कॉलेज, बाबुपेठ रोड चंद्रपूर.
