Monday, October 5, 2026
HomeElectionईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या

ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या

चंद्रपूर :- ईव्हीएम EVM मशीनचा वापर बंद करून आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, तसेच CEC मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडियाच्या वतीने शनिवारी (३ ऑक्टोबर) चंद्रपूर शहरातील गांधी चौक परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. Remove EVMs, conduct ballot paper wise elections

फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अय्यूबभाई कच्छी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ईव्हीएमच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

आंदोलनात फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अय्यूब भाई कच्छी, राष्ट्रीय अध्यक्ष (यूथ विभाग) अरशद कच्छी, राष्ट्रीय महासचिव सफीरुद्दीन ख्वाजा, राष्ट्रीय महानगर अध्यक्ष देवा हिंगोरानी, राष्ट्रीय सदस्य तथा भद्रावती-वरोरा तालुका अध्यक्ष नागेंद्र चटपल्लीवार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विनोद गेडाम, चंद्रपूर शहराध्यक्ष जुनेद खान, भद्रावती शहर उपाध्यक्ष जितेंद्र गुलानी, भद्रावती तालुका उपाध्यक्ष सुनील रामटेके, भद्रावती महिला तालुकाध्यक्षा जया मेश्राम, भद्रावती महिला शहराध्यक्षा विभा बेहरे यांच्यासह अब्दुल रेहमान शेख, आतिफ शेख, जाकीर शेख, मजीद पठाण, राजिक कच्छी, कैफ कुरैशी आदी पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या समारोपावेळी फोरमचे राष्ट्रीय सदस्य तथा भद्रावती-वरोरा तालुका अध्यक्ष नागेंद्र चटपल्लीवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular