Red alert on September 1 for Chandrapur district
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्याला हवामान खात्याने (IMD) 31 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट Orange Alert तर 1 सप्टेंबर 2024 रोजी रेड अलर्ट Red Alert देण्यात आला आहे.
तरी सगळ्या नागरिकांनी सतर्क राहावे. नदी जवळील पाणी वाढत असेल व नालावरून पाणी वेगाने वाहत असेल तर नाला, नदी अथवा पुलावरून पाणी जात असेल तर त्या प्रकारच्या पूलावरून कोणीही रस्ता ओलांडू नये. अथवा वाहन घेऊन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
तसेच सर्व अधिकाऱ्यांना अलर्ट वर राहून आपले मुख्यालय न सोडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.