Ramnagar police nabs thief who committed theft
चंद्रपुर :- रेल्वे स्टेशन परिसराजवळील सपना टॉकीज जवळ छत्तीसगड येथील प्रवाश्याकडून 50000 रुपये हिसकावून पळविणाऱ्या आरोपीला रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक दृष्ट्या तपास करून अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली. Chandrapur Crime
छत्तीसगड येथील प्रवासी मधुराम कोल्हा तमिळनाडू येथून रेल्वेने चंद्रपूर येथे आला त्याचे गावाकडे जाणारी बस दुसऱ्या दिवशी दिनांक 13 जून ला सकाळी 5 वाजता असल्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात थांबला असताना पाणी बॉटल खरेदी करण्यासाठी सपना टॉकीज जवळ जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्याचे तोंड दाबून खिशातील 50,000 रुपये हिसकावून पळवले याची तक्रार प्रवाश्याने रामनगर पोलीस स्टेशन येथे दाखल केली. Ramnagar Police Station
सदर गुन्हयाची माहिती Ramnagar DB Scott रामनगर गुन्हे शोध पथकाला मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा गुप्त बातमीदार व तांत्रीक दृष्ट्या तपास केला असता त्या आधारावर मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शेख जुबेर शेख कादर (33) रा. रहेमतनगर चंद्रपूर हयास अटक करून त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेली नगदी रोख 50000 रुपये हस्तगत करण्यात आले. पुढील तपास स.पो.नी. निलेश वाघमारे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक असीफराजा शेख, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे प्रमुख सपोनी देवाजी नरोटे, सपोनी हनुमान उगले, सपोनी निलेश वाघमारे, पोहवा पेत्रस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंद्रे, लालु यादव, जितेंद्र आकरे मपोहवा मनिषा मोरे, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, प्रफुल पुष्पलवार, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, सुरेश कोरवार मपोशि ब्युल्टी साखरे यांनी केली.