Thursday, April 16, 2026
HomePollutionराजुरा नगर परिषदेचा ५० कोटी ९८ लाखांचा अर्थसंकल्प मंजूर..

राजुरा नगर परिषदेचा ५० कोटी ९८ लाखांचा अर्थसंकल्प मंजूर..

Rajura Municipal Council’s Budget of ₹50.98 Crore Approved

चंद्रपूर :- राजुरा नगर परिषदेमार्फत सन २०२५–२६ साठी सुधारित तसेच सन २०२६–२७ साठी सुमारे ५० कोटी ९८ लाख रुपयांचा विकासाभिमुख अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत सादर करून मंजूर करण्यात आला. मा. नगराध्यक्ष श्री. अरुण रामचंद्रराव धोटे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२ मार्च २०२६ रोजी झालेल्या सभेत हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. करमूल्यांकनाच्या माध्यमातून महसुलात वाढ झाल्यामुळे १२,००,५६९ रुपयांच्या शिलकीसह हे अंदाजपत्रक सभागृहाने मंजूर केले.

बंडू धोत्रे यांचे आंदोलन मागे…….

या सभेला उपनगराध्यक्ष श्री. दिलीप देरकर, सर्व सभापती, नगरसेवक तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. निखील लांडगे आणि विभागप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला नगराध्यक्षांनी अर्थसंकल्पातील ठळक बाबी सभागृहासमोर मांडत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

पोलीस भरतीमुळे चंद्रपुरात वाहतुकीत बदल……

अर्थसंकल्पात शहर विकासाला प्राधान्य देत विविध महत्त्वाच्या योजनांसाठी निधी राखून ठेवण्यात आला आहे. शहरात नवीन उद्यान निर्मिती, नगरपरिषद शाळांचे संवर्धन व विकास, शहरालगतच्या तलावाचे संवर्धन, वाढीव पाणीपुरवठा योजना, तसेच नगर परिषद कार्यालयासमोर खाऊ गल्ली (फूड कोर्ट) उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे.

घरकुल योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी २.५ कोटी रुपये, शबरी आवास योजनेसाठी ७५ लाख रुपये, तर रमाई आवास योजनेसाठी १ कोटी रुपये निधी राखण्यात आला आहे. याशिवाय दलित वस्ती सुधार योजनेसाठी १.५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील मूलभूत सुविधांवरही विशेष भर देण्यात आला असून रस्ते विकास, भूमिगत गटारे, चौकांचे सौंदर्यीकरण, प्रत्येक वॉर्डात वीज व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन मजबूत करणे, मलनिस्सारण प्रकल्प आणि सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच महिला व बालकल्याण, दिव्यांग व दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रत्येकी ५ टक्के निधी राखण्यात आला आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत २४ तास सुयोग्य पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून घनकचरा व्यवस्थापन व जनजागृती उपक्रमांसाठी १.५ कोटी रुपयांचा निधी राखण्यात आला आहे. एकूणच, शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत करत नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याच्या उद्देशाने राजुरा नगर परिषदेचा हा अर्थसंकल्प विकासाभिमुख व लोकहिताचा असल्याची भावना सभागृहात व्यक्त करण्यात आली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular