Prioritize the work of citizens. – MP Pratibha Dhanorkar
मौजा ताडाळी छोटी पडोली मधील लेव्हल 40 रेल्वे क्रॉसिंग उडाण पुलाच्या बांधकामाकरीता संपादित जमिनीचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या कडे तात्काळ बैठक घेऊन शेतकऱ्यांना संपादीत जमिनीचा मोबदला देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुल-पोंभुर्णा तालुक्यातील मेंढपाळांना चराई क्षेत्रासाठी जागा राखीव करुन देण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. त्यासोबतच चंद्रपूर शहरातील नागरिकांना स्थायी पट्टे देण्यासंदर्भात प्रस्ताव शासनाकडे पाठवावा व नागरीकांना स्थायी पट्टे कसे देता येईल याकरीता शासनाने उपाययोजना कराव्यात अशी सुचना देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.
तसेच गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देण्यात यावा यासाठी कृषी अधिकारी व संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
नागरिकांच्या समस्यांना अधिकाऱ्यांनी प्राधान्याने सोडवावे अशा सूचना देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या.
मनपा तील उद्यान विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे अशा देखील सूचना संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच यापुढे कोणत्याही कंत्राटदाराची मुजोरी खपवून घेणार नाही अशी ताकीद देखील यावेळी संबंधीत कंत्राटदाराला दिली.
यावेळी बैठकीत मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी व नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.