Mahavikas Aghadi just ‘passed the time’
Sudhir Mungantiwar criticizes the opposition
Prime Minister Narendra Modi’s meeting in Chimur
चंद्रपूर :- गेली 50 वर्षे सत्ता उपभोगताना काँग्रेसने काहीच केले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातही निव्वळ ‘टाइमपास’ केला. अडिच वर्षे निव्वळ विकासाच्या गप्पा करण्यात घालवली, अशी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच भाजप-महायुतीचे उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. Prime Minister Narendra Modi’s meeting in Chimur
चिमूर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राचा विकास का झाला नाही, असा प्रश्न काँग्रेसचे नेते तोंड वर करून विचारतात. त्याचे उत्तर काँग्रेसच्या कार्यकाळातच आहे. गेली 50 वर्षे काँग्रेसने महाराष्ट्रात राज्य केले. विकासाच्या नावाखाली काँग्रेसने केवळ भोपळा दिला. त्यामुळं विकासाचे ‘रिपोर्ट कार्ड’ विचारण्याचा कोणताही हक्क काँग्रेसच्या नेत्यांना नाही. Mahavikas Aghadi just ‘passed the time’
Sudhir Mungantiwar criticizes the opposition
लाडक्या बहिणीला काँग्रेस घाबरली
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. त्यावेळ सगळ्या सावत्र भावांचे पोट दुखले. दीड हजार रुपये सरकारने बहिणींना देऊ नये म्हणून काँग्रेसकडून कोर्टात केस दाखल केली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. महायुतीच्या योजनेला व्यापक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसलं. त्यामुळे काँग्रेस घाबरली. आता त्यांचेच नेते बहिणींना तीन हजार रुपये देऊ असे सांगत आहेत, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
शिवप्रतापदिनी संकल्पपत्र
महायुतीने आपला वचननामा शिवप्रतापदिनी साजरा केला. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. त्याच दिवशी महायुतीने संकल्पपत्र जाहीर केला आहे. राज्यातील महाभकास आघाडीच्या मागे जाऊ नका, असे आवाहनही ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.
तर… महाराष्ट्राचा व्यापक विकास होईल
उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारच्या काळात केवळ फेसबुक लाइव्ह केले. ते केवळ केंद्र सरकारवर टीका करताना दिसतात. ज्या लोकांमध्ये राज्य करण्याची क्षमता नाही, त्यांना कौल देऊ नका. केंद्रात विश्वगौरव,पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सरकार आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले तर डबल इंजिनमुळे महाराष्ट्राचा व्यापक विकास होईल, असा विश्वासही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.