Competitive Examination Coordination Committee supports MLA Subhash Dhote
चंद्रपूर :- विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय उमेदवार आमदार सुभाष धोटे Subhash Dhote यांची प्रत्त्यक्ष भेट घेऊन स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य, शाखा चंद्रपूरच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून. पून्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन करून जनसेवेचे कार्य अविरत सुरू ठेवणेसाठी प्रचंड बहुमताने विजयी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. Competitive Examination Coordination Committee supports MLA Dhote
राज्यातील तसेच जिल्हातील बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आपण निवडून आल्यास आमच्या जाहीरनाम्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली आणि विधानसभा निवडणुकीत आ. सुभाष धोटे यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती चे जिल्हाध्यक्ष अॅड. राम इंगळे, सुयोग झाडे, अरुण पर्वतावर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.