Saturday, January 18, 2025
HomeChief Ministerआयोगास संवैधानिक दर्जा देवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ओबीसींना न्याय दिला- हंसराज अहीर

आयोगास संवैधानिक दर्जा देवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ओबीसींना न्याय दिला- हंसराज अहीर

Prime Minister Narendra Modi gave justice to OBCs by giving constitutional status to the commission – Hansraj Ahir

चंद्रपूर :- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगास माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी संवैधानिक दर्जा बहाल केल्याने देशभरातील ओबीसी बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व नोकरी विषयक न्याय प्रश्न सोडविण्यास गती मिळाली असून आयोगाला या संवैधानिक अधिकारामुळे विविध राज्यातील आरक्षण घोटाळ्‌यांचा पर्दाफाश, ओबीसींचे नोकरीतील आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणाच्या संधी व इतरही प्रश्नांची सोडवणूक करणे शक्य झाल्याचे आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी ओबीसी प्रवर्गातील मायको ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करतांना सांगितले. Prime Minister Narendra Modi gave justice to OBC

मुंबई येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis याच्या सागर या शासकीय निवासस्थानी मायको ओबीसी घटकाच्या विविध समस्याच्या सोडवणूकीकरिता दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी बैठक आयोजित करून मायको ओबीसीमधील विविध घटकांचे मुलभूत प्रश्न, समस्या, गाऱ्हाणी, मागण्या या बैठकीत अध्यक्ष हसराज अहीर यांनी व अन्य नेते मंडळींनी ऐकून घेतल्या गवळी समाज, कोहळी समाज, येल्लम रेड्डी समाज बांधवांची स्वतंत्र बैठक घेवून त्यांच्या विविध समस्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला केंद्रीयमंत्री भुपेंद्र यादव, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, विजय चौधरी, संजय गाते, हिरामण आप्पा, अशोक मंडले, प्रकाश बाळबुध्दे, प्रा. सदानंद बोरकर, सोमेश्वर गहाणे, ह.भ.प नाथ महाराज, किशन बडगीरे, शिवाजीराव बिहाने याचेसह अन्य मान्यवर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत गवळी समाजाने पशुखाद्यावरील जीएसटी माफ करणे, एनटीबी मधून एनटीसी मध्ये समावेश करणे, पशुकरिता चराई क्षेत्र उपलब्ध करणे आदी मागण्यांचे निवेदन आयोगास सादर केले कोहळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, KOHALI या शब्द उल्लेखातील दुरुस्ती व अन्य मागण्या उपस्थित प्रतिनिधींनी केल्या.

येल्लम रेड्डी समाजाच्या वतीनेही आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर याना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व महाराष्ट्र राज्य सरकारने सामाजिक न्यायाची भुमिका स्वीकारून समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे भरीव कार्य केल्याबद्दल या बैठकीत समाजबांधवांनी आभार मानले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular