Pistol, cartridge, sword seized in Chandrapur
Action by local crime branch
चंद्रपूर :- शहरात कॉम्बिग ऑपेरेशन Combing Operations राबवित स्थानिक गुन्हे शाखेने LCB लखमापूर परिसरातून दोन इसमांकडून अग्नीशस्त्र गावठी बनावटी पिस्टल, एक जिवंत काडतूस व मयाणसहित एक धारदार तलवार जप्त करीत दोन आरोपीना अटक केली आहे. Pistol, cartridge, sword seized
चंद्रपुर शहरात अवैध धंदयावर तसेच अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगाणा-यावर कारवाईचे धाडसत्र सुरु असतांना आज दिनांक 6 ऑगस्ट स्थानिक गुन्हे शाखेने रामनगर हद्दीतील लखमापुर येथे अवैध धंदयावर तसेच अग्नीशस्त्रा संबंधाने कारवाई करणेकरिता पोउपनि विनोद भुरले व पोलीस पथक यांनी कोंबीग ऑपरेशन राबवुन लखमापुर येथुन आरोपी दिपक उमरे, रा. राजुरा, जि. चंद्रपुर, ह.मु. लखमापुर, चंद्रपुर याचेकडुन एक गावठी बनावटी अग्नीशस्त्र व एक जिवंत काडतुस तसेच पोहवा प्रकाश बलकी व पथक यांनी आरोपी विक्रम जुनघरे, रा. छत्तीसगड कॉलनी, लखमापुर याचे घरून एक लोखंडी धारदार तलवार व मयान असा एकूण 26,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ChandrapurToday Crime
दोन्ही आरोपीवर पोलीस स्टेशन रामनगर येथे भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी मागील एक महिण्यात 3 नग बनावटी पिस्टल तसेच 1 नग थारदार तलवार जप्त करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुग्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा किशोर वैरागडे, रजनिकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, संजय वाडई, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, नितीन साळवे, नितेश महात्मे, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि गणेश भोयर, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, मिलींद जांभुळ, मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.