Friday, January 17, 2025
HomeHealthखबरदार.. सामान्य रुग्णास त्रास दिल्यास पेटून उठू - महादेव तपासे

खबरदार.. सामान्य रुग्णास त्रास दिल्यास पेटून उठू – महादेव तपासे

Agitation if common patient is disturbed – Mahadev Tapase

चंद्रपूर :- राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची अवहेलना बघताच नेहमी सामान्यातील सामान्य नागरिकांच्या मदतीला धावणाऱ्या नेतृत्वाने पेटून उठण्याची मशाल हाती घेतली आहे.

भाजपा चंद्रपूर जिल्हा कामगार उपाध्यक्ष महादेव तपासे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक (CS) यांना निवेदनातून सूचित केले आहे की, राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत वैद्यकीय अधीक्षक म्हणून (MS) डॉ. मुनेश्वर भोंगाळे हे नामनिर्देशित राहत असून मागील महिन्यापासून ते आजपर्यंत अविरत सुट्टी रजा चे नावावर आपले भंडारा येथे वास्तव्य करीत आहेत, त्यांच्या या गैरहजेरीमध्ये राजुरा व आजूबाजूच्या गाव खेड्यातून उपजिल्हा रुग्णालयामध्ये येणाऱ्या अनेक रुग्णांवर उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याकडून थातुरमातुर उपचारांवर रेफर टु चंद्रपूर पाठविले जातात व त्या रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक, मानसिक त्रासाला समोर जावे लागत आहे. सोबतच रुग्णालयातील अनेक कर्मचारी हे रुग्ण व नातेवाईकांशी उद्धट वागणूक करीत आहे. यापुढे रुग्णांची ही दशा आम्ही कदापि खपवून घेणार नाही त्याकरिता राजुरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती करून रुग्णांची होणारी अवहेलना टाळावी..

अन्यथा आम्ही भाजपा चंद्रपूर जिल्हा कामगार आघाडीतर्फे पेठुन उठू असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.

यावेळी भाजपा जिल्हा कामगार मोर्चा आघाडीचे नेतृत्व जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे ,किसान आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष राजीव घरोटे, जनार्दन निकोडे ,संजय जयपूरकर ,राजू गंगशेट्टीवार आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular