Silver Medal to Chaitali Borkute-Katlawar for Outstanding Performance in the Drama “Kusum Manohar Lele”
चंद्रपूर :- 63 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा चंद्रपूर येथे दि. 25 नोव्हेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यातील विविध संस्थांनी 18 नाटकांचे सादरीकरण केले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ह्युमन युनायटेड मल्टीपर्पज सोसायटी (हम) या संस्थेद्वारा ’’कुसुम मनोहर लेले‘‘ हे नाटक सादर करण्यात आले. Outstanding Performance in the Drama “Kusum Manohar Lele”
जाहिर झालेल्या निकालामध्ये ’’कुसुम मनोहर लेले‘‘ या नाटकात सुजाताचे पात्र साकार करणाऱ्या ऍड . चैताली बोरकुटे – कटलावार यांना उत्कृष्ट अभिनयासाठी ‘‘रौप्य पदक’’ जाहिर करण्यात आले. तर भाच्या हेे पात्र साकार करणारे विशाल ढोक यांना उत्कृष्ट अभिनयासाठी ‘‘अभिनय प्रमाणपत्र’’ घोषित करण्यात आले.

चैताली बोरकुटे यांनी गेल्या दोन दशकांपासून अभिनय क्षेत्रात चाहत्यांची वाहवा मिळविली आहे. त्यांचा अभिनय नेहमीच दर्शकांच्या मनास भिडणारा असल्याने या नाटकातही त्यांनी आपल्या पात्राला न्याय देवून रौप्य पदकाचा मान मिळविला आहे. Silver Medal to Chaitali Borkute-Katlawar
विशाल ढोक Vishal Dhok यांनी ही उत्कृष्ट अभिनयातून लौकिक संपादन केला असून त्यांनीही या पुर्वी विविध नाटकाद्वारे आपल्या अभिनयाची चुनुक दाखविली आहे.
त्यांच्या या उत्कृष्ट अभिनय व सन्मानाबद्दल नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.



