Saturday, January 18, 2025
HomeAcb Trapमहावितरणकडून थकबाकीमुक्ती व पुनर्विजजोडणीची संधी

महावितरणकडून थकबाकीमुक्ती व पुनर्विजजोडणीची संधी

Only 13 days left for Abhay Yojana ::        Dues waiver and re-connection opportunity from Mahavitran Msedcl

चंद्रपूर :- विजबिल थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित (परमनंट डिस्कनेक्ट) असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा 6 हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्विजजोडनीची संधी महावितरण Msedcl अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या योजनेला केवळ 13 दिवस उरले आहेत. Only 13 days left for Abhay Yojana

आतापर्यंत चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत 3 हजार 845 लघु व उच्च दाब थकबाकीदार ग्राहकांनी सहभाग नोंदविला असून त्यातील 3 हजार 519 वीजग्राहकांनी 1 कोटी 86 लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

थकीत वीजबिलांमुळे 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरू केली आहे. त्यामध्ये कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित लघु व उच्चदाब वर्गवारीतील सर्व घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. Dues waiver and re-connection opportunity from Mahavitran

यामध्ये केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण 100 टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होणार आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणि आणखी 10 टक्के तर उच्च दाब ग्राहकांना आणखी 5 टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरुवातीला 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यात भरण्याची देखील सोय आहे. महावितरण अभय योजनेची मुदत येत्या दी.31 डिसेंबरला-2024 संपणार आहे. अभय योजनेमध्ये परिमंडळांतर्गत आतापर्यंत सहभागी 3 हजार 519 वीज ग्राहकांनी 1कोटी 86 लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

“महावितरण अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या फ्रेंचायझी क्षेत्रातील ग्राहक देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महावितरण चंद्रपूर परिमंडळ कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.”
हरीश गजबे मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ,चंद्रपूर

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular