Tuesday, October 13, 2026
HomeNationalदीक्षाभूमीवर ‘आम्ही भारताचे लोक’ आंबेडकरी सांस्कृतिक चळवळी

दीक्षाभूमीवर ‘आम्ही भारताचे लोक’ आंबेडकरी सांस्कृतिक चळवळी

चंद्रपूर : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर १५ व १६ ऑक्टोबर रोजी आयोजित सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘आम्ही भारताचे लोक, आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य, जिल्हा चंद्रपूर’ यांच्या वतीने माहितीपर स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलच्या माध्यमातून आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा विचार, चळवळ उभी करण्यामागील भूमिका, कार्य, उद्देश आणि उद्दिष्टे यांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. (We, the People of India) – An Informative Stall on the Ambedkarite Cultural Movement at Deekshabhoomi

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी एकत्र येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करण्यासाठी तसेच दीक्षाभूमीला नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या अनुयायांपर्यंत आंबेडकरी चळवळीचा विचार पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. Dhammachakra Anupravartan Day

मुख्य समन्वयक आयु. संदेश शालिनी संभाजी कर्डक यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्टॉलवर उपस्थित प्रतिनिधी नागरिकांना चळवळीच्या कार्याची आणि उद्दिष्टांची सविस्तर माहिती देतील. तसेच माहितीपत्रकांचे वाटप करून चळवळीचा प्रसार व प्रचार करण्यात येणार आहे.

१५ ऑक्टोबरला उद्घाटन, पाणी व माहितीपत्रकांचे वाटप

गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन होईल. त्यानंतर सकाळी ११.४० वाजता तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करून मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी १२ वाजता अनुयायांना पाणी व माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येईल.

शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून हा स्टॉल नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा देत, या स्टॉलला एकदा तरी अवश्य भेट देऊन आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन चळवळीचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आयु. हरिचंद्र अलोणे यांनी केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचा प्रसार होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular