Saturday, May 9, 2026
HomeAccidentजिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करा*

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करा*

Ensure effective enforcement of law and order in the Chandrapur district

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच वाढत्या अपघाताला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके Guardian Minister Dr Ashok Wuike यांनी नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक आयुश नोपानी SP Ayush Nopani यांना दिल्या. Ensure effective enforcement of law and order in Chandrapur District

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते.

चंद्रपूरमध्ये अवैध धंदे व गुंडागर्दी खपवून घेतल्या जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्या नागरिकांवर त्वरित पोलिस विभागाने कारवाई करावी. याबाबत कोणतीही हयगय करू नये.

चंद्रपूर शहरात गत तीन-चार दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचा बळी गेला आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. शहरातून जड वाहनांची अनिर्बंध पद्धतीने वाहतूक होत असल्यास तात्काळ त्यावर कारवाई करावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular