Thursday, November 30, 2023
Homeधार्मिकराष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व पिलावन पाटील पुण्यतिथी निमित्त कोळवन येथे सुगम...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व पिलावन पाटील पुण्यतिथी निमित्त कोळवन येथे सुगम संगीत व भजन संध्या संपन्न

On the occasion of Rashtrasant Tukdoji Maharaj’s death anniversary and Pilavan Patil’s death anniversary, a light music and bhajan evening was held at Kolvan.                         यवतमाळ :- वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55 व्या पुण्यतिथी निमित्त व स्वर्गीय रामरावजी हनुमंतरावजी पिलावन पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य सुगम संगीताचा व भजनाचा कार्यक्रम आर्णी तालुक्यातील कोळवन येथे संपन्न झाला.

दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोज सोमवारला आर्णी तालुका प्रसिद्धीप्रमुख श्री मारुती भाऊ पिलावंन यांचे राहते घरी कोळवण, तालुका आर्णी येथे वंदनीय तुकडोजी महाराज व स्वर्गीय रामरावजी पिलावन यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सायंकाळी ६.३० वाजता सामुदायिक प्रार्थना व त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली, संध्याकाळी ८ ते ९ आदरणीय पं. श्री ज्ञानेश्वर बालपांडे सर यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम झाला त्यानंतर रात्रो भजनाचा कार्यक्रम झाला. On the occasion of Rashtrasant Tukdoji Maharaj’s death anniversary and Pilavan Patil’s death anniversary, a light music and bhajan evening was held at Kolvan.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा प्रचारक ह. भ. प. दत्ताभाऊ मार्कंड, आर्णी तालुका सेवा अधिकारी शिवदास भाऊ परळीकर, आर्णी तालुका प्रचार प्रचारक श्याम खडके, तालुका भजन प्रमुख रोहिदासभाऊ जाधव, यवतमाळ जिल्हा भजन प्रमुख पिंगळे पाटील, आर्णी तालुका सचिव तुळशीरामजी वाघमारे, पंडित ज्ञानेश्वर बालपांडे सर, बाबूलालभाऊ राठोड, गणेशभाऊ मोरे, विनायक सावदे, विकास ठाकरे, राजूभाऊ सोनकुसरे, चिं.वसु वानखडे व आर्णी तालुक्यातील इतर गुरुदेव सेवक व गावकरी मंडळी उपस्थित होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular