Sunday, April 21, 2024
Homeआरोग्यशिवसेना पदाधिकाऱ्यांची दुर्गापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक पाहणी ; वैद्यकिय अधिकारी व...

शिवसेना पदाधिकाऱ्यांची दुर्गापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक पाहणी ; वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी आले गोत्यात

Shiv Sena officials make a surprise visit to Durgapur primary health center                     चंद्रपुर :- दुर्गापुर प्राथमिक आरोग्य केंद्रात राहण्यासाठी वसाहत असताना देखील डॉक्टर व स्टॉप मुख्यालयी राहत नसल्यामुळे दि. 12 नोव्हेबर 2023 ला रात्री 2 वा.च्या सुमारास सुकन्या संदीप देठेकर नामक महिलेची डिलीवरी नर्सच्या तत्परतेने वेळेवर आलेल्या डॉक्टरच्या सहाय्याने डिलीवरी सुरळीत पार पडली, ही माहिती मिळताच शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, तालुका संघटक संजयकुमार शिंदे व राजू रायपुरे अचानक भेट दिल्यामुळे डॉक्टर व कर्मचारी गोंधळून गेल्याचे निदर्शात आले.

दुर्गापुर प्राथमिक आरोग्य केंद्र चंद्रपुर जिल्ह्यातील सर्वात मोठे व प्रथम क्रमांक प्राप्त आरोग्य केंद्र असून याठिकाणी डॉक्टर व कार्यालयीन स्टॉपकरीता राहण्यासाठी वसाहत असताना देखील डॉक्टर व स्टॉप मुख्यालयी राहत नसल्यामुळे आपातकालीन स्थितीत व डिलीवरीला येणाऱ्या लोकांना जीव मुठित घेवून दाखल व्हावे लागत आहे.

त्याचप्रमाणे मनुष्यबळ कमी असल्यामुळे तसेच डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सेसवर कामाचा व्याप वाढवून काही नर्सला 12-12 तास कामे करावी लागत आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास स्टाप उपलब्ध ठेवणे, डॉक्टर व कर्मचारी यांनी नियमित आपले ओळखपत्र कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकारक असताना देखील कुणीही पालन करत नव्हते.

सदर प्रकरणाची पाहणी करताना चंद्रपुर तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. पड़गीलवार हे सुद्धा याच संदर्भात आल्याने सदर बाबींचा संपूर्ण अहवाल तयार करुन वरिष्ठ अधिकारी यांना निदर्शनात आणून देण्यात यावी व याची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आम्हाला शिवसेना पद्धतीने सदर प्रकरण हाताळावे लागेल अशा इशारा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, तालुका संघटक संजयकुमार शिंदे व राजू रायपुरे यांनी दिला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular