Monday, November 4, 2024
HomeAgricultureनागपूर विधानभवनावर फडकवणार स्वतंत्र विदर्भाचा झेंडा
spot_img
spot_img

नागपूर विधानभवनावर फडकवणार स्वतंत्र विदर्भाचा झेंडा

Independent Vidarbha flag to be hoisted on Nagpur Vidhan Bhavan on August 10: Information of Vidarbha State Movement Committee in press conference

चंद्रपूर (चंद्रपूर) :- मागील 119 वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे, यासाठी विविध व्यासपीठावर मागणी करून 12 वर्षापासून सतत जनआंदोलन करून विदर्भ राज्य आंदोलन समिती ने विदर्भ राज्याची मागणी तीव्र केली आहे. आता विदर्भ राज्य आंदोलन समिती 10 ऑगस्ट 2024 ला नागपूर विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकवणार आहे.

आंदोलना पूर्वी समितीचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियम येथे 10 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजता एकत्र येणार असून समिती चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विधानभवन (संविधान चौक) पर्यत लॉंगमार्च ‌Long March काढून विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा ध्वज फडकविणार आहे अशी माहीती विदर्भ राज्य आंदोलन समिति चे अध्यक्ष वामनराव चटप यांनी श्रमिक पत्रकार भवन मध्ये आयोजित पत्रकार परीषदेत दिली. Independent Vidarbha flag to be hoisted on Nagpur Vidhan Bhavan

या आंदोलनामध्ये 11 तालुक्यातील जवळपास 5000 लोक सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजप BJP सह अनेक पक्षांनी विरोधी पक्षात असतांना स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी आंदोलना मध्ये भाग घेतला होता परंतु सत्तेत येताच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती बाबतीत विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहे.

लोकसभा निवडणूकीत वचन न पाळलेल्या केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षाला विदर्भातील जनतेने विदर्भातील लोकांची दिशाभूल केल्याबद्दल जरब बसविली आहे. आता सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य दिले नाही तर आगामी काळात विधानसभा निवडणूकीत विदर्भातील जनता याचे चोख उत्तर देणार असेही चटप म्हणाले. Information of Vidarbha State Movement Committee in press conference

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी आणि विदर्भातील नागरिकावरील अन्याय संपविण्याच्या दृष्टीने नव्या केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी “महाराष्ट्रवादी चले आओ” चा नारा देत समिती पुन्हा रणशिंग फुंकणार आहे. कुठल्याही परिस्थितीत 10 ऑगस्ट 2024 ला विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपूर येथे विधानभवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याचा झंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे असेही म्हणाले.

आंदोलनात केंद्र सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अन्नधान्यावरील जीएसटी GST तात्काळ रद्द करावी, अतिवृष्टीने झालेल्या पिक नुकसानीची भरपाई तात्काळ देण्यात यावी, साप चावून मरणाऱ्या व्यक्तीस मदत मिळावी, राज्यात दुष्काळी परिस्थिती मुळे पिक विमाधारक शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, विदर्भात स्मार्ट प्रीपेड मीटर Smart Prepaid Meter कुठेही लावू नये, आष्टी ते सुरजागड कांक्रीट रस्ता बांधकाम ला राज्य सरकारने त्वरित मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करण्यात यावी, बल्लारशहा सुरजागड रेल्वे मार्गास केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून ‌द्यावी अशीही मागणी करण्यात येणार असल्याचे चटप यांनी सांगीतले.

पत्रपरीषदेत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष एड. वामनराव चटप, पूर्व विभाग अध्यक्ष अरूण केदार, मुकेश मासुरकर, डा. रमेश गजबे, किशोर दहेकर, कपिल इद्दे, मितीन भागवत, अंकुश वाघमारे, गोपी मित्रा, अरूण वासलवार, अनिल दिकोंडवार, मुन्ना आवळे आदि उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular