local crime branch seized a large cache of weapons from the office of Swapnil Kashikar, accused in the crime of murder
चंद्रपूर :- २५ जानेवारी २०२४ रोजी चंद्रपुर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन Ramnagar Police Station हद्दीतील अरविंदनगर परिसरात ७-८ इसमांनी मिळून शिवा वझरकर या इसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. त्यामुळे चंद्रपुर शहरात एकच खळबळ माजली होती. Murder Crime
सदर गुन्ह्याचे गांभिर्य पाहून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर LCB Chandrapur यांचेकडे सोपविला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी वेगवेगळी पथके तयार करून सदर गुन्ह्यातील आठ आरोपींना अटक केली.
सदर गुन्ह्यातील अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचेवर शरीरीराविरूद्धचे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्ह्यात आरोपी हे पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून यातील मुख्य आरोपी स्वप्नील काशिकर याचा रेतीचा तसेच ट्रान्सपोर्ट चा व्यवसाय आहे.
यातील मृतक हा यापुर्वी स्वप्नील काशिकर याचेकडेच ठेकेदारीचे काम करायचा. पुढे चालून वर्चस्वाच्या तसेच पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून स्वप्नील काशिकार याचे ऑफीसचे समोरील मोकळ्या जागेतच सदर खुनाचा गुन्हा घडून आला.
पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान स्वप्नील काशिकर याचे ऑफीसची झडती घेतली असता त्याचे ऑफीसचे सोफ्यातून एक लोखंडी तलवार, एक एअर गन, ऑफीस टेबलचे खाली एक लोखंडी तलवार व एक स्टीलचा खंजीर असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला. सदरचा शस्त्रसाठा पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आला.
सदर शस्त्रसाठा कुठून आणला याबाबत आरोपींकडून सखोल तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि नागेशकुमार चतरकर, सपोनि किशोर शेरकी, सपोनि विकास गायकवाड, पोउपनि विनोद भुरले, पोहवा. सुधिर मत्ते, पोशि. नितीन रायपुरे, मिलींद जांभुळे, प्रमोद कोटनाके, प्रमोद डंभारे, रूषभ बारसिंगे यांनी केली आहे.