MLA Kishore Jorgewar’s Diwali break with the N.R.H.M. employees while visiting the workers’ protest site
◆ भाऊबीज निमित्त महिला कर्मचा-यांनी आ. जोरगेवार यांना केले औक्षवंत चंद्रपूर :- विविध मागण्यांना घेऊन एन. आर. एच. एम. च्या कर्मचा-यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समीतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन सुरु केले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलन स्थळी भेट देत आपल्या मागण्या रास्त असून त्या सोडविण्यासाठी पुर्ण शक्तीनिशी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी एन.आर. एच. एम. च्या महिला कर्मचा-यांनी भाऊबीज करत आमदार किशोर जोरगेवार यांचे औक्षवंत केले. कर्मचा-र्यांच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी एक बैठक आयोजित करण्याच्या दिशेने प्रयत्न करेल हीच भाऊ म्हणून ओवळणी राहील असे यावेळी ते म्हणाले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व आंदोलनकर्त्या कर्मचा-यांसह दिवाळीचा फराळ केला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी रविंद्र उमाटे, डाॅ. तिरथ उराडे, अतुल शेंद्रे, डाॅ. अक्षय बुर्लावार, डाॅ. दीपक भट्टाचार्य, वनिता मेश्राम, डाॅ. विनोद फुलझेले, ललिता मुत्तेलवार, डाॅ. तुषार आगडे, जया मेंदळकर, अश्विनी येंबरवार, प्रफुल रासपल्ले, रुपेश हिरमठ, मित्रंजय निरंजने यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, कार्तिक बुरेवार आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत शहरी, ग्रामीण व एन यु एच एम अंतर्गत कार्यरत तसेच एन एच एम कंत्राटी कर्मचा-यांना वयाची अट शिथिल करुन नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरनात्मक निर्णय घेण्यात यावा, विशेष भरती मोहिम दर सहा महिण्यांनी राबविण्यात यावी, एनएचएम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एच. आर पाॅलिसी त्वरित लागु करण्यात यावी, एम एच एम अतंर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ईपीएफ योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा यासह ईतर मागण्यांना घेऊन एन.आर.एच.एम. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. चंद्रपूरातही जिल्हाधिकारी कार्यालया समोर त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनर्त्यांची भेट घेतली. एैन दिवाळीत तुमचे आंदोलन सुरु आहे. तुम्ही दिवाळी साजरी केली नाही. त्यामुळे मी स्वतः दिवाळीचा फराळ करण्यासाठी आपल्याकडे आलो असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. आपल्या मागण्या रास्त आहे. सरकारकडेही याचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यावर तोडगा निघावा यासाठी मी सुध्दा प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. शिक्षण आणि आरोग्य सेवा बळकट झाली पाहिजे. हे करत असतांना हि सेवा देणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांच्याही समस्या सुटाव्यात ही भावना आपली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुरक्षा आणि सन्मान मिळावा ही आमची जबाबदारी आहे. अधिवेशनात आपला विषय नक्कीच मांडणार आहे. पण त्यापुर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आपली भेट घडवून आणण्यासाठीही माझे प्रयत्न राहणार असल्याचे ते यावेळी प्रसंगी म्हणाले.
आज आपण महिला भगीणींनी भाऊबीज साजरी करत मला औक्षवंत केले. त्यामुळे भाऊ म्हणून माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. माझ्या बहिणींना रस्त्यावर दिवाळी साजरी करावी लागत असेल हे दुर्भाग्य आहे. मात्र आपण चिंता करु नका हा भाऊ प्रत्येक कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही या प्रसंगी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. यावेळी आंदोलनकर्ते अधिकारी आणि कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.