The National Commission for Backward Classes will hold a hearing in Mumbai
चंद्रपूर/यवतमाळ/नागपूर :- महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या लोध, लोधा, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, सैन, किराड, भोयर पवार, सुर्यवंशी गुजर, बेलदार, झाडे, झाडे कुणबी, डांगरी, कलवार, निषाद मल्ला, कुलवंतवाणी, कराडी, शेंगर, नेवेवाणी, कानोडी, कानडी या जातींचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, नवी दिल्ली यांचेकडे निवदने प्राप्त झालेली आहेत.
सदर निवेदनाच्या अनुषंगाने आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर Hansraj Ahir यांचे अध्यक्षतेखाली दि. 26 जुलै रोजी सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल, मुंबई येथे सुनावणी आयोजित करण्यात आलेली आहे. The National Commission for Backward Classes will hold a hearing in Mumbai
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे निवेदने सादर केलेल्या लोध, लोधा, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, सैन, किराड, भोयर पवार, सुर्यवंशी गुजर, बेलदार, झाडे, झाडे कुणबी, डांगरी, कलवार, निषाद मल्ला, कुलवंतवाणी, कराडी, शेंगर, नेवेवाणी, कानोडी, कानडी जाती संघटनांच्या सदस्यांनी कागदपत्रे व पुराव्यासहीत सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात आले आहे.