Friday, February 7, 2025
HomeEducationalनवीन राष्ट्रीय धोरणाअंतर्गत प्राध्यापकांचा कार्यभार व विद्यार्थी संख्या, वेळापत्रक बाबत मार्गदर्शन करा

नवीन राष्ट्रीय धोरणाअंतर्गत प्राध्यापकांचा कार्यभार व विद्यार्थी संख्या, वेळापत्रक बाबत मार्गदर्शन करा

Under the new national policy, guide the workload of the professors and the number of students, time table

Request to the Joint Director (Higher Education) Gondwana University Young Teachers Association

चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील विद्यापीठाकरिता NEP-2020 लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे गोंडवाना विद्यापीठांमध्ये NEP – 2020 नुसार सत्र 2024 – 25 करिता प्रवेश देणे चालू आहे. गोंडवाना विद्यापीठाने विविध विद्याशाखा अंतर्गत बास्केट व अभ्यासक्रम निर्देशित केलेले आहे, मात्र प्रत्येक विद्याशाखे करिता प्राध्यापकांचा नेमका कार्यभार, विद्यार्थी संख्या तसेच निर्धारित वेळापत्रक याबाबत स्पष्ट खुलासा नसल्याने प्राध्यापकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

या पार्श्वभूमीवर नवीन राष्ट्रीय धोरण अंतर्गत प्राध्यापकांचा कार्यभार विद्यार्थी संख्या व वेळापत्रक याबाबत उचित मार्गदर्शन करून स्पष्ट निर्देश काढावे अशी मागणी गोंडवांना यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने नागपूर विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ.संतोष चव्हाण यांच्याकडे केली आहे.

तरी या संदर्भात उचित शासन स्तरावर आपण मार्गदर्शन करावे व विविध शाखेंतर्गत प्राध्यापकांचे नेमके कार्यभार, विद्यार्थी संख्या व वेळापत्रक याविषयी स्पष्ट निर्देश देण्यात यावे अशी गोंडवाना टीचर्स संघटनेच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव डॉ.विवेक गोर लावर, उपाध्यक्ष डॉ. विजय वाढई, संघटनेचे पदाधिकारी डॉ रामदास कांमडी, डॉ. पंकज धूमणे, डॉ. निलेश चिमूरकर यांच्या स्वाक्षऱ्या असून सहसंचालक यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular