Action against 17 persons under National Tobacco Control Programme
चंद्रपूर :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर तर्फे जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील वेगवेगळ्या विभागात तंबाखुचे सेवन करणारे कर्मचारी तसेच नागरिक अशा 17 जणांवर कोटपा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून 2700 रुपयांचा दंडसुध्दा वसूल करण्यात आला. National Tobacco Control Programme
सदर कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील वेगवेगळ्या विभागात कोटपा कायदा कलम चार अंतर्गत 17 लोकांवर 2700 रुपयांची कारवाई करण्यात आली.
यात आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाटबंधारे विभाग, उमेद कार्यालय, बांधकाम विभाग, सीडीसीसी बँक, पाणी व स्वच्छता विभाग, समाज कल्याण विभाग, वित्त विभागातील कर्मचारी व नागरिकांचा समावेश होता.
यावेळी तंबाखूमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत कार्यालयात मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.
सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा सल्लागार डॉ.श्वेता सावलीकर, समुपदेशक मित्रानजय निरांजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, मल्टीटास्क वर्कर शंकर संगमवार अतुल शेंद्रे, सुरज बनकर त्यांच्यामार्फत करण्यात आली.