Maha Vikas Aghadi is the best solution for all common people’s issues – MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कंबर कसली असून सर्व विधानसभा क्षेत्रात प्रचार सुरु केला आहे. महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दौरा करीत आहेत. MVA is the best solution for all common people’s issues
प्रचारादरम्यान नागरीकांशी चर्चा करुन सर्व सामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी महाविकास आघाडी सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर व्यक्त केले आहे. दि. 09 नोव्हेंबर 2024 रोजी गोंडपिपरी तालुक्यात विविध गावातील भेटी दरम्यान राजूरा विधानसभा क्षेत्रातील विकासामुख MVA महाविकास आघाडी चे उमेदवार सुभाष धोटे Subhash Dhote यांना प्रचंड बहूमताने विजयी करण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.