MNS protest against CDCC Bank recruitment corruption by flying printed notes
चंद्रपूर :- 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि खऱ्या अर्थाने भारतात लोकशाही लागू झाली व भारत प्रजासत्ताक झाला. 26 जानेवारी 2025 रोजी भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे असे असले तरी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र लोकशाहीची ,संविधानाची व एससी, एसटी,ओबीसी आरक्षणाचे हत्या होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ व अधिकाऱ्यांच्या वतीने लिपिक व शिपाई पद मिळून 358 पदाकरिता पदभरती घेण्यात येत आहे. ही पदभरती घेत असताना भारतात सरकारी नोकऱ्यांमध्ये संविधानाप्रमाणे लागू एससी, एसटी,ओबीसी व महिलांच्या आरक्षणाला तिलांजली देत सरसकट भ्रष्ट मार्गाने आर्थिक व्यवहारातून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पदभरती घेण्यात येत आहे अशाप्रकारे ही लोकशाहीची निंदा आहे. बिंदू नियमावलीप्रमाणे पदभरती न घेता सदर भरती प्रक्रिया मनमानी पद्धतीने राबवली जात आहे. MNS protest against CDCC Bank recruitment corruption by flying printed notes
समाजात उपेक्षित घटकांमध्ये समानता आणण्यासाठी आणि सामाजिक अन्यायापासून एससी, एसटी ओबीसी यांचे संरक्षण व्हावे यासाठी आरक्षणापासून त्यांचे स्थान सुरक्षित करण्यात येते. जातीभेद न करता रोजगारांमध्ये समान व्यासपीठ मिळावे यासाठी मागासवर्गीय प्रवर्गाला भारतीय संविधानाप्रमाणे आरक्षण देण्यात आले आहे.
परंतु चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे हे लक्षण लोकशाही धोक्यात असल्याचे, संविधान संपविण्याचे व एससी, एसटी ,ओबीसी आरक्षण हटविण्याचे आहे अशाप्रकारे देशद्रोह चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळ व अधिकारी करीत आहे परंतु अद्यापही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पदभरती घोटाळा व झालेला आर्थिक व्यवहार विधानसभेत व लोकसभेत मांडण्यात आला परंतु या भरती प्रक्रियेवर किंचित देखील फरक पडला नाही नंतर सारेच मूंग गिळून गप्प झाले. SC/ST/ OBC च्या मतावर निवडून यायचं व त्यांचेच सरकारी नोकरीतील आरक्षण धोक्यात असताना लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घ्यायची नाही अशी भूमिका घेतलेली दिसते.
26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिष्टमंडळ चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक कार्यकारी मंडळाला जाब विचारणा करिता गेले असता बँकेच्या आत मध्ये बँकेचे अध्यक्ष व मुख्याधिकारी राजेश्वर कल्याणकर उपस्थित असून देखील भेट देण्याचे टाळले.
सदर पदभरती घोटाळा संदर्भात याआधीच 21 डिसेंबर 2024 रोजी मनसेतर्फे सचिन भोयर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते. त्यावर कोणती कार्यवाही झाली याचीच विचारणा मनसेचे नगरसेवक सचिन भोयर सह शिष्टमंडळ करणार होते. अखेरीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सीडीसी बँकेच्या आर्थिक व्यवहार करून होणाऱ्या पदभरती घोटाळ्याकडे, भ्रष्टाचाराकडे भारत सरकार ,महाराष्ट्र सरकार व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता बँकेच्या गेटसमोर 500 व 100 च्या छापील नोटा उडवीत संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून एससी ,एसटी ,ओबीसी आरक्षणासह ही पदभरती नव्याने घेण्यात यावी याकरिता मनसे नगरसेवक सचिन भोयर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.
.जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निषेध करण्यात आला यावेळी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष महेश वासलवार, ,रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांचे सह अन्य पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



