MLA Subhash Dhote’s campaign office inaugurated by MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या विधानसभा निवडणुक प्रचारार्थ लोकप्रिय खा. प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar आणि आ. सुभाषभाऊ धोटे MLA Subhash Dhote यांच्या हस्ते गोंडपिपरी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तथा माता कन्यका सभागृह गोंडपिपरी येथे महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांची संवाद बैठक उत्साहात पार पडली. तसेच खा. प्रतिभा धानोरकर आणि आ. सुभाषभाऊ धोटे यांनी संयुक्तपणे गोंडपिपरी तालुक्यातील मौजा विठ्ठलवाडा, भंगाराम तळोधी, हिवरा, धाबा, लाठी, सकमूर, वेजगाव, आर्वी, तोहगाव, परसोडी येथे गाव भेटी दौरा करून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी मार्गदर्शन करताना खा. प्रतिभा धानोरकर म्हणल्या की, लोकसभा निवडणुकीत आ. सुभाष धोटे यांनी मला विजयी करण्यासाठी बापाची भुमिका पार पाडून मला प्रचंड बहुमताने निवडून आणले आता मी लेकीची भुमिका पार पाडुन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी परिश्रम घेणार असल्याची ग्वाही दिली. तर आ. सुभाष धोटे यांनी सांगितले की, क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले आणि विविध विकासकामे पूर्ण केली असून येणाऱ्या काळात आपण सर्वांगसुंदर राजुरा विधानसभा मतदारसंघांच्या निर्मिती व सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करणार आहे त्यामुळे मला पून्हा प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले. MLA Subhash Dhote’s campaign office inaugurated by MP Pratibha Dhanorkar
यावेळी जेष्ठ काँग्रेस नेते सुरेश पाटील चौधरी, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेस निरिक्षण अनुपम सर, विजेएनटी विभाग प्रदेश अध्यक्ष अॅड. पल्लवी रेनके, नगराध्यक्षा सविता कुडमेथे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, सोनूताई दिवसे, देवेंद्र बट्टे, शिवसेनेचे सुरज माडुरवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल गायकवाड, काँग्रेस कार्याध्यक्ष निलेश संगमवार, शहराध्यक्ष राजू झाडे, माधुरीताई येलेकर, सुनील संकुलवार, अजय माडुरवार, अनिल झाडे, प्रवीण नरहरशेट्टीवार, अशोक रेचनकर, देविदास सातपुते, मनोज नागापुरे, साईनाथ कोडापे, राजू चंदेल, रफिक शेख, माधव लडके, गौरव घुबडे, नरेश तुंबडे, शीलाताई बांगरे, वनिता वाघाडे, रंजना रमागिरकर, नगरसेवक बांबोडे, गौतम झाडे, यासह गोंडपिपरी तालुक्यातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस, राष्ट्रवादी (श. प), शिवसेना (उभाठा), आम आदमी पार्टी, व सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.