Saturday, April 26, 2025
HomeMaharashtraचंद्रपुरात 'MH-34, हमारा चांदा' चित्र प्रदर्शनीचे आयोजन

चंद्रपुरात ‘MH-34, हमारा चांदा’ चित्र प्रदर्शनीचे आयोजन

Organization of ‘MH-34, Hamara Chanda’ picture exhibition at Chandrapur

चंद्रपूर :- चित्रकार प्रविण कावेरी यांच्या ‘MH-34, हमारा चांदा’ MH 34, Hamara Chanda या चंद्रपूर जिल्हयातील समृध्द ऐतिहासिक वारसा संदर्भातील चित्र प्रदर्शनीचे आयोजन दिनांक 15, 16 आणि 17 ऑगस्ट, 2024 दरम्यान स्थानिक भारतरत्न लता मंगेशकर कला दालन, प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आज आयोजित पत्रपरिषदेत प्रवीण कावेरी यांनी दिली. MH-34, Hamara Chanda’ picture exhibition

पॉप आर्ट या वैशिष्टयपूर्ण शैलीतील चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक 15 ऑगस्ट, 2024 रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar यांच्या हस्ते होणार असून महावितरणाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे आणि इंडियन नॅशलन ट्रस्ट फॉर आर्ट कल्चरल हेरिटेजच्या गव्हींग कौन्सिलचे सदस्य श्री. अशोकसिंह ठाकूर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सदर चित्र प्रदर्शनीचे हे सलग 8 वे वर्ष असून यावर्षी प्रदर्शनीत विविध विषयांवरील काही नविन चित्रांचा समावेश राहणार आहे.

या तीन दिवसीय प्रदर्शनीला चंद्रपूर जिल्हयातील जनतेने मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन प्रवीण कावेरी, प्रवीण निखारे, अनिल दहागांवकर, किशोर महेश्वर, नंदू सोनारकर, सुरज सोनारकर, चिन्नाबाबू कुंभार यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular