MLA Sudhakar Adabale appointed as member of Employment Guarantee Scheme Committee
सभापतींनी केली तीन समित्यांवर नियुक्ती
चंद्रपूर :- नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांची रोजगार हमी योजना समितीसह अन्य दोन समित्यांवर सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. appointed as member of Employment Guarantee Scheme Committee
आमदार सुधाकर अडबाले यांचे विधान परिषदेतील कार्य पाहता त्यांची ‘रोजगार हमी योजना समिती, इतर मागासवर्ग कल्याण समिती व कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे’ या तीन समित्यांवर सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषद सदस्यांमधून सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
आमदार अडबाले यांनी या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले असून, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, मजूर आणि ग्रामीण जनतेच्या हितासाठी ही संधी उपयोगात आणणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार सुधाकर अडबाले यांच्या नियुक्तीबद्दल म. रा. मा. शि. महामंडळाचे सरचिटणीस माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, जयकुमार सोनखासकर, विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, बाळासाहेब गोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, जिल्हा, महानगर, तालुका पदाधिकारी, सदस्यांनी अभिनंदन केले आहे.