Mahavikas Aghadi calls for Chandrapur Bandh on 24th August against Badlapur Atrocities
चंद्रपूर :- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणा-या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अमानवी कृत्याविरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. ज्या शाळेत हे अत्याचार झाले ती शाळा BJP भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी RSS संबंधित लोकांची आहे. सत्ताधारी लोकांशी संबंधित लोक यामध्ये सहभागी असल्याने पोलीस प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या आईची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसांना त्या गरोदर मातेला ११ तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवले. हे पोलीस आणि सरकारच्या गलथान कारभाराचे आणि असंवदेशीलतेचे ज्वलंत उदाहरण आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यातच माता, भगिनी, महिला सुरक्षित नाही तर राज्यातील इतर भागात कायदा व सुव्यवस्था कशी असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दि. २० ऑगस्ट रोजी या घटनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बदलापूर मध्ये आंदोलन करून रेल रोको केला. पण सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असताना स्थानिक नागरिकांनी हे प्रकरण लावून धरल्याने सरकारला नाईलाजाने कारवाईला सुरुवात करावी लागली. Mahavikas Aghadi calls for Chandrapur Bandh
राज्यभरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींवर अत्याचार सुरु आहेत. सरकार आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. महिला मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बदलापूरच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. म्हणून आधी महाविकास आघाडीची जागावाटपाची बैठक रद्द करून नेत्यांनी राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि महिला सुखक्षेच्या मुद्यावर चर्चा करून या असंवेदनशील सरकारविरोधात दि. २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी च्या प्रमुख नेत्यांच्या निर्देशास सकारात्मक प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्हातील महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यापारी, उद्योजक, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन हा महाराष्ट्र बंद यशस्वी करावा असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्षा बेबीताई उइके, शहर जिल्हाअध्यक्ष दीपक जयस्वाल, शिवसेना (ऊ. बा. ठा.) जिल्हाध्यक्ष संदीप गिरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र शिंदे, सि. आय. टी. यू . चे. प्रा. रमेशचंद्र दहिवडे आणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिलीप चौधरी यांनी आवाहन केले.
