LCB raid on online cricket betting
चंद्रपूर :- घुग्गुस परिसरातील म्हातारदेवी येथे क्रिकेट सामन्यांवर सट्टा (Cricket Betting) लावणाऱ्या सट्टेबाजावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारत 42 लाखांचा मुद्देमाल जप्त केला, आरोपी अंशुल रामबाबू रॉय (26 वर्ष) रा म्हातारदेवी, घुग्गुस विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. LCB raid on online cricket betting
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घुग्गुस परिसरात पेट्रोलिंगवर असतांना म्हातारदेवी परिसरात एक इसम हा आपल्या राहत्या घरी मोबाईल वर ऑनलाईन पद्धतीने सध्या सुरु असलेल्या लिजेंड लीग भारत विरुद्ध वेस्टइंडीज क्रिकेट सामन्यांवर India Vs West Indies Cricket Match ऑनलाईन सट्टा घेतल्या जात असल्याची खबर एलसीबी पथकाला मिळाली, Local Crime Branch Chandrapur
या खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अंशुल रामबाबू रॉय याचे घरी छापा टाकून एक अँपल कंपनीचा मोबाईल, अंगझडीत 3 लाख रुपये, 38 लाख रुपयांची ऑनलाईन जुगार आयडी असा एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत आरोपी विरुद्ध घुग्गुस पोलीस स्टेशन येथे जुगार कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ChandrapurToday Crime

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवयरे, रजनिकांत पुठ्ठवार, दिपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे, मिलीद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.