A staunch ganja seller arrested after setting a trap
चंद्रपूर :- बल्लारपूर शहरातील अट्टल गांजा विक्रेता बल्लारपूरातून चंद्रपूर शहरात गांजा विक्रीकरिता नेत असतांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून LCB Trap त्याचेजवळून गांजा व दुचाकी असा एकूण 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी विरुद्ध एनडिपीएस कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. staunch ganja seller arrested after setting a trap
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली कि, बल्लारपूर येथील लालचंद केसकर हा गांजा व्यावसायिक असून बल्लारपूर येथून चंद्रपूरला विक्री करण्यासाठी आपल्या दुचाकी होंडा ऍक्टिवा वाहनाच्या डिक्कीतून गांजा वाहतूक करणार आहे, या गोपनीय माहितीवरून पथकाने आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी बल्लारपूर – चंद्रपूर मार्गांवरील चुनाभट्टी बस स्टॅन्ड जवळ सापळा रचला, आरोपी येतांना दिसताच त्याची दुचाकी होंडा ऍक्टिवा एम एच 34 सी एल 5025 अडवून झडती घेतली असता ऍक्टिवाच्या डिक्कीत 5 किलो 478 ग्रॅम हिरवे कॅनाबीस गांजा वनस्पतीची पाने, फुले व बिया (गांजा) आढळून आला.
यावरून आरोपी लालचंद केसकर (64 वर्ष) रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर याचे विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (N.D.P.S.Act) अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली, त्याचेजवळील गांजा व वापरती दुचाकी होंडा ऍक्टिवा असा एकूण 1,82,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.Drug trafficking आरोपीला पुढील तपासाकरिता बल्लारपूर पोलीस ठाणे यांच्या स्वाधीन करण्यात आले. ChandrapurToday Crime
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि. संतोष निंभोरकर, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे, रजनिकांत, चेतन, महंतो, प्रशांत शेंदरे , प्रफुल, किशोर वाकाटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.



