Saturday, January 18, 2025
HomeAcb Trapनॉयलॉन मांजा विक्रेत्यावर एलसीबी ची कारवाई

नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर एलसीबी ची कारवाई

LCB action against nylon manja seller

चंद्रपूर :- मानवी जीविता सोबतस पशुपक्षांना धोकादायक अश्या प्रतिबंधित नॉयलॉन मांजा विक्रेत्यावर चंद्रपूर गुन्हे शाखेने धाड टाकीत प्लास्टिक चक्रीवर गुंडाळलेला नॉयलॉन मांजा असा एकूण 24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी विक्रेत्यावर रामनगर पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

31 डिसेंबर 2024 च्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेमधील अधिकारी व अंमलदार चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदारांकडुन माहिती मिळाली की, रयतवारी बी.एम.टी चौक चंद्रपूर परीसरात श्रावण साविता रा. रयतवारी चंद्रपूर हा त्याचे राहते घरी पंतग उडविण्यासाठी नॉयलॉन मांजाची लपुन विक्री करीत आहे, अशा माहितीवरून श्रावणकुमार शिवकुमार सविता, वय 28 वर्षे, रा. रयतवारी कॉलनी, बी.एम.टी चौक, चंद्रपूर याचे राहते घरी स्थानिक गुन्हे शाखेने रेड केली असता घरी विविध रंगाच्या प्लास्टिक चकीवर गुडांळलेला प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा असलेल्या चकऱ्या असा एकुण 24,000 रुपयांचा माल आढळून आल्याने जप्त करण्यात आला.

घरी पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा अवैधरित्या विकी करीता साठवुन ठेवणे तसेच प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा धागा हा मानवी जिवितास तसेच पर्यावरण, पक्षी यांना घातक व धोकादायक असल्याचे माहिती असुन सुध्दा जाणिवपूर्वक स्वतःचे आर्थिक फायदयासाठी विक्रीकरीता ताब्यात बाळगने करिता आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223, 292, 293 सहकलम 5, 15 पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे रामनगर करीत आहे.

सदरची कारवाई सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक यांचे सुचनेप्रमाणे दिपक कांकेडवार सहायक पोलीस निरीक्षक, संतोष निंभोरकर पोलीस उप निरीक्षक, पोलीस नाईक संतोष येलपुलवार, अंमलदार गोपीनाथ नरोटे, गोपल आतकुलवार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular