Janata Career Launcher maintains the great tradition of success in 12th standard
विज्ञान शाखेचा निकाल १००% ; बहुतांश विद्यार्थी प्राविण्यप्राप्त
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या सत्र २०२४-२५ चा निकाल आज (दि. ५) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता करिअर लॉन्चरने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे. जनता करिअर लॉन्चर विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागलेला आहे.
जनता करिअर लॉन्चरमधून कु. शर्वरी कजपवार, कु. रिया चहारे, गजानन जेनेकर, कु. सावी एकरे, स्वप्नील एकोणकर, कु. प्राची गायकवाड, कु. हार्दिका काकडे, कु. रिया ढेंगळे, सार्थक खडसे, कु. तनुश्री कुचणकर, यश कर्मनकर, सोहम गोखरे, नैतिक भेंडारकर, कु. धनश्री धोबे, कु. तन्वी बांदूरकर, कु. प्राची चिवंडे आदी विद्यार्थी प्राविण्यप्राप्त झाले आहेत.
यामधे ८०% पेक्षा अधिक गुण घेणारे अनेक विद्यार्थी प्राविण्यप्राप्त झाले आहेत.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे, उपाध्यक्ष अंबर जीवतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे, उपप्राचार्य सौ. के. ए. रंगारी, प्रा. लीलाधर खंगार, प्रा. नितीन कुकडे, प्रा. प्रेमा झोटिंग, प्रा. बबन राजुरकर, प्रा. श्याम डोहे, प्रा. आल्हाद बहादे, विष्णू ठाकरे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.