Friday, January 17, 2025
HomeCrimeराष्ट्रध्वज तिरंग्याचा अपमान, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

राष्ट्रध्वज तिरंग्याचा अपमान, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

Insulting national flag tricolor :: File sedition case against officers and employees – Aam Aadmi Party demand

चंद्रपूर :- ऑगस्ट महिन्यात देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा अभियान  Har Ghar Tiranga राबविण्यात आले होते.

हे अभियान राबवण्याची जिम्मेदारी प्रशासनातील अधिकाऱ्यांची तथा कर्मचाऱ्यांची होती. हे अभियान राबवून झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना आपल्या जिम्मेदारीचा जनु विसरच पडला की काय असे चित्र चंद्रपूर प्रशासकीय भवन मधील अन्न पुरवठा विभागात पहायला मिळाले. Insulting national flag tricolor

आम आदमी पक्षाचे Aam Aadmi Party युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे हे एका कामानिमित्त कार्यालयात गेले असतांना कार्यालयातील टेबलवर देशाचे राष्ट्रध्वज फाडून त्याचा पोछा बनवून फरशी पुसायसाठी ठेवले असे दिसले. या संदर्भात तिथे उपस्थित जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांच्याशी संवाद साधल्या नंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. प्रत्यक्षात ही बाब त्यांच्या वारंवार निदर्शनास येऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत होते. यावरून या घटनेचे प्रत्यक्षदर्शी जिम्मेदार जिल्हा पुरवठा अधिकारी व‌ कर्मचारी आहे
हे ग्रुहीत धरून या संदर्भात आज रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच देशद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या विरुद्ध एफ आय आर नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली. File sedition case against officers and employees

यावेळेला AAP आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा संघटन मंत्री योगेश मुऱ्हेकर, भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, जिल्हा कोषाद्यक्ष सरफराज शेख, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला महानगर अध्यक्ष तब्बसूम शेख, शहर संघटनमंत्री संतोष भाऊ बोपचे, अनुप तेलतुबडे, मनीष राऊत, अमित बोरकर, प्रशांत सिदूरकर, राज नगराळे, आदित्य नंदनवार, विकास खाडे, इत्यादी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular