NCP’s Shivswarajya Yatra in Ballarpur, fight for Maharashtra’s self-esteem
चंद्रपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या 9 ऑगस्ट पासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रेची Shivswaraj Yatra सुरुवात झाली ती यात्रा 12 तारखेला बल्लारपूर मतदारसंघात पोहोचली, बालाजी सभागृह बल्लारपूर येथे सायंकाळी 8 वाजता प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शिवस्वराज्य यात्रे’ दरम्यान बल्लारपूर, येथे सभा संपन्न झाली. NCP’s Shivswarajya Yatra in Ballarpur
जिल्हाकार्याध्यक्ष बेबीताई उईके व शहर जिल्हाध्यक्ष दिपक जयस्वाल यांनी चंद्रपूर, बल्लारपूर विधानसभा ही आपल्या पक्षाच्या कोट्यात घ्यावी आयात उमेवाराला पक्षात तिकीट देवू नका, आपल्याच पक्षातल्या व्यक्तीला तिकीट द्या अशी मागणी केली. बल्लारपूर विधानसभा करीता राजेन्द्र वैद्य, बेबीताई उईके, दिपक जयस्वाल, सुमित समर्थ, पक्षाकडे उमेदवारी फार्म भरले असून चंद्रपूर करीता भाणेश मातंगी यांनी उमेदवारी मागितली आहे यापैकी कोणालाही तिकीट देण्यात यावी एकदिलाने काम करु अशी मागणी केली.
बल्लारपूर चंद्रपूर मतदार संघात आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार देण्याचा नक्कीच प्रयत्न करू मात्र माविकास आघाडी म्हणून सर्वांनी एकजुटीने लढणे गरजेचे आहे. तुतारी हे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवावे यासाठी प्रयत्न करा. लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही महावीकास आघाडीचा या ठिकाणाहून विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
शिवस्वराज्य यात्रा राज्यात लोक जागर करत असताना राज्यातील सध्याचे महत्त्वाचे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने यात्रा सुरू केलेली आहे. असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष यांनी केले.
याप्रसंगी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, शब्बीर विद्रोही, युवा प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष,सुनील गव्हाणे, सामाजिक न्याय विभागाचे पंडित कांबळे, जिल्हा निरीक्षक दिलीप बनकुले, ज्येष्ठ नेते ऍड.हिराचंद बोरकुटे, जिल्हा कार्याध्यक्ष बेबीताई उईके, शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल, युवक जिल्हाध्यक्ष सुमित समर्थ, यूवक कार्याध्यक्ष संजय ठाकुर, युवक शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, डी के अरीकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुधाकर काकडे, विधानसभा अध्यक्ष जयंत टेमुर्डे बल्लारपूर शहरध्यक्ष बादल उराडे, जीवती नगराध्यक्ष कविता आडे, राजूभाऊ काब्रा, कैलाश राठोड, हिराजी पावडे, राजेश कवठे, अविनाश धेगळे, आसिफ सय्यद, बबलू शेख, किसन वासाडे, सुरेश वासाडे, भास्कर कावडे, अंकित निवलकर, शरद मानकर, वंदना आवळे, शुभांगी साठे, मल्लेशवरी महेशकर, शहजादी अन्सारी, अर्चना चावरे, निताताई गेडाम, लक्ष्मी गेडाम तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.