Curb the increasing crime and illegal business in Rajura
चंद्रपूर :- पोलीस स्टेशन राजुरा अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिसरातील सर्व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. Curb the increasing crime and illegal business in Rajura
विशेष म्हणजे IPS अनिकेत हिरडे आणि असे कर्तव्यदक्ष अधिकारी जोपर्यंत राजुरा पोलिस स्टेशन मध्ये सेवा देत होते तेव्हा राजुरा येथे परिस्थिती बऱ्यापैकी सुव्यवस्थित दिसून आली. मात्र असे कर्तुत्ववान अधिकारी येथून गेलोपासून तालुक्यात दारू, कोळसा, जुगार, सट्टाभट्टी, जनावर तस्करी, भंगार चोऱ्या, अवैध दारू, गांजा, चरस, एम. डी. ड्रग्ज विक्री सारख्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राजुरा सारख्या शांततामय शहरात काल परवाच एका महिलेचा अज्ञाताकडून खून झालेला आहे. या आधी पण अश्या घटना घडत आलेल्या आहेत. यातून पोलीस प्रशासनाचे नियंत्रण कमी होत असल्याचे दिसून येते आहे.
त्यामुळे सर्व अवैध धंद्यानवर लगाम ठेवण्यासाठी येथे या सर्व समाजविघातक घटनांवर अंकुश ठेवणारे कार्यतत्पर अधिकारी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करून कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे. Chandrapur District Youth Congress District President Shantanu Dhote’s statement to the Superintendent of Police
दरम्यान त्यांच्या या मागणीवर पोलीस अधीक्षक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राजुरा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी आवश्यक पावले प्रशासनाकडून घेतली जातील अशी शाश्वती दिली आहे.
