Tuesday, March 25, 2025
HomeEducationalदीक्षाभूमी येथे 1 कोटी रुपयांने साकार झालेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण

दीक्षाभूमी येथे 1 कोटी रुपयांने साकार झालेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण

The book with 1 lakh books will give a new direction to Gyan Yatra – MLA Kishore Jorgewar                                        Inauguration of Abhyasika realized at Dikshabhumi Chandrapur

चंद्रपूर :- अभ्यासिका म्हणजे केवळ पुस्तके वाचण्याची जागा नव्हे, तर ती विचारांच्या मुक्त प्रवाहाची, नवीन ज्ञानाच्या शोधाची, आणि आत्मविकासाची जागा आहे. या ठिकाणी आपण आपले विचार अधिक व्यापक आणि दृष्टी अधिक विस्तारित करू शकतो. 1 कोटी रुपयांमध्ये पवित्र दीक्षाभूमी Chandrapur Deekshabhoomi परिसरात साकार झालेल्या या अभ्यासिकेत 1 लाख पुस्तकांचा संग्रह राहणार असून ही अभ्यासिका आपली ज्ञानयात्रा अधिक सशक्त आणि प्रभावी बनविण्यासाठी सहायक ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांनी 1 कोटी रुपयांमध्ये दीक्षाभूमी परिसरात तयार केलेल्या अभ्यासिकेचा आज लोकार्पण सोहळा पार पडला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेरोरिअर सोसायटीचे अध्यक्ष अरुन घोटेकर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेरोरिअर सोसायटीचे उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, सदस्य अॅड. राहुल घोटेकर, डाॅ. बाबासाहेब कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेश दहेगांवकर, श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे सचिव अजय जयसवाल यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर आदींची प्रमुख पाहूणे म्हणून मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, निवडून आल्यावरच आपण चंद्रपूरच्या दीक्षाभूमी विकासासाठी प्रयत्नशील झालो होतो. या कामात अनेक तांत्रिक अडचणी होत्या, मात्र त्या सोडवण्यात आपल्याला यश आले. येथे 57 कोटी 90 लाख रुपयांमध्ये लवकरच विकासकामांना सुरुवात होणार आहे. मात्र त्या अगोदर आपण येथे अभ्यासिकेचे लोकार्पण करून या विकासकामांच्या सुरुवातीचा पाया रचला असल्याचे त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.

विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे. या पाच वर्षात अनेक संकल्प पूर्ण करता आले. यातील एक संकल्प दीक्षाभूमीच्या विकासाचा आपण केला होता. बाबूपेठ उड्डाण पुलासाठीही आपण शेवटच्या टप्यातील कामासाठी 5 कोटी 49 लाख रुपयांचा निधी देऊ शकलो, आणि महिन्याभरात हा पूल ही नागरिकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक शांत आणि प्रेरणादायी वातावरणाची गरज असते. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांनी दीक्षा दिलेल्या पवित्र अशा जागेवर आपण ही अभ्यासिका तयार केली आहे. ही जागाच जगासाठी प्रेरणादायी आहे. सोबतच येथील शांत वातावरण, उत्तम सुविधा, आणि विविध प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात अधिक मदत करू शकेल.

शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर विद्यार्थ्यांची विचारशक्ती आणि स्व-अभ्यासाची सवयही वृद्धिंगत होईल. विद्यार्थ्यांनीही या संधीचा लाभ घ्यावा, आणि आपलं भविष्य घडवण्यासाठी येथे मिळणाऱ्या सुविधांचा योग्य प्रकारे उपयोग करावा. आपल्या या अभ्यासिकेच्या लोकार्पणामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि अभ्यासातील लक्ष अधिक वाढेल, अशी आशा यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला नारिकांसह विद्यार्थांची ही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular