Wednesday, July 15, 2026
HomeAccidentआकाशवाणी ते नगिनबाग नाल्याला सिमेंट काँक्रीटची भिंत

आकाशवाणी ते नगिनबाग नाल्याला सिमेंट काँक्रीटची भिंत

Allocate ₹16 crore for constructing a cement concrete wall along the Akashvani-to-Naginbag Nallah

चंद्रपूर :- चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या ‘आकाशवाणी ते नगिनबाग’ या मुख्य नाल्याला दोन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रीटची मजबूत संरक्षक भिंत बांधण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत १६ कोटी रुपयांचा विशेष निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंथ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. या संदर्भातील सविस्तर मागणीचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करून येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत नगरसेवक सुरेंद्र अडबाले, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक सुनील खंडेलवार, नगरसेवक विनोद लभाने, नगरसेवक राहुल चौधरी, नगरसेविका सुनंदा धोबे, प्रोफेशनल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, मिसार, यश दत्तात्रय आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

चंद्रपूर शहरातील आकाशवाणी परिसर ते नगिनाबाग हा अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग आहे. या भागातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याला संरक्षक भिंत नसल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात येथे पूरस्थिती निर्माण होते. नाल्याचे दूषित व पुराचे पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरत असल्याने स्थानिक नागरिकांना दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. याशिवाय, साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो.

या अत्यंत संवेदनशील समस्येवर स्थानिक प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पावसाळ्यातील संभाव्य धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर या नाल्याचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, अशी सूचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनांतर्गत १६ कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करून या नाल्याच्या दोन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी त्यांनी या भेटीदरम्यान केली.

यावर जिल्हाधिकारी वसुमना पंथ यांनी सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular