Wednesday, April 15, 2026
HomeCrimeगोवंशाची अमानुष, अवैध वाहतूक

गोवंशाची अमानुष, अवैध वाहतूक

Inhumane Transport of Illegally Sourced Cattle Exposed in Dhaba Area

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत पो.स्टे. धाबा हद्दीत गोवंशाची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत एकूण २६ गोवंशीय जनावरांची (गाय, बैल, गोरे) सुटका करण्यात आली असून १९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाबा पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करीत संशयित दोन पिकअप वाहनांना अडवून तपासणी केली असता त्या वाहनांमध्ये गोवंशीय जनावरांना अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले यात विश्वास प्रकाश मांडवगडे (वय २२, रा. इंदिरानगर, गोंडपिपरी), कृष्णा उर्फ चिरकुट (रा. बेंबाळ, ता. मुल), रवि तोराम (रा. लक्कडकोट, ता. राजुरा),  श्याम मडावी (रा. लक्कडकोट, ता. राजुरा),  समीर खान (रा. राजुरा) आणि अज्जु शेख (रा. कागजनगर, तेलंगणा) या आरोपींविरुद्ध पो.स्टे. धाबा येथे प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(१)(ड) तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ (सुधारित २०१५) चे कलम ५, ५(अ), ५(ब) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी २६ जनावरे, दोन पिकअप वाहने आणि एक मोबाईल फोन असा एकूण १९,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दिपक कॉक्रेडवार, बलराम झाडोकार, धर्मेंद्र मडावी (उप पो.स्टे. धाबा) तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदारांनी सक्रिय सहभाग घेतला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular