Fatal truck accident on Gondpipari Kothari routes
चंद्रपूर :- गोंडपिपरी कोठारी राष्ट्रीय महामार्गांवर आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान सुरजागड वरून कोठारी कडे जाणाऱ्या दोन ट्रकांची जोरदार टक्कर झाली यात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक ट्रक चालक गंभीर जखमी झाला.
या भीषण अपघातामुळे गोंडपिपरी – कोठारी मार्गांवर वाहतूक जाम झाली आहे. Fatal truck accident on Gondpipari Kothari routes
माहितीनुसार सुरजागड वरून येणाऱ्या दोन भरधाव ट्रकांची आपआपसात जोरदार भिंडत झाली यात एक ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या ट्रक चालकाला स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले.
कोठारी पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील कारवाई सुरु आहे. Kothari Police Station
या भीषण अपघातामुळे दोन्ही बाजूने वाहतूक विस्कळीत झाली झाली असून दोन्ही बाजूने ट्राफिक जाम झाल्याने वाहणांच्या रांगा लागल्या.