illegal cattle smuggling near Maharashtra-Telangana border
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील टेकामांडवा पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने LCB मोठी कारवाई करत महाराष्ट्र-तेलंगणा राज्य सिमेवरील चिखली खुर्द येथील वन तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून १७ पिकअप वाहनांतून अवैधरित्या कत्तेसाठी नेल्या जात असलेल्या ५३ गौवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या प्रकरणी २४ आरोपींना अटक करण्यात आली असून, १ कोटी ५२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. illegal cattle smuggling near Maharashtra-Telangana border
गोपनीय माहितीवरून मध्यरात्री सापळा रचण्यात आला होता. पथकाने चिखली खुर्द येथे अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवले आणि जनावरांची सुटका करत आरोपींना ताब्यात घेतले. Chandrapur Police
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कॉक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि जगन्नाथ मडावी, तसेच अनेक पोलीस कर्मचारी व चालक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन टेकामांडवा यांच्या संयुक्त पथकाने केली असून, जिल्ह्यात अवैध कत्तलेच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी पोलिसांची ही महत्त्वाची कामगिरी ठरली.
