Tree planting and tree planting activities are conducted enthusiastically at Nimani
कोरपना शहर प्रतिनिधी – विश्वनाथ झाडे
कोरपना :- कोरपणा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निमणी येथे दिनांक ५ जुलै २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात निमणी गावातून प्रभातफेरी स्वरूपात वृक्षदिंडीने झाली. या दिंडीत सहभागी झालेल्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा”, “झाडे वाचवा – जीवन वाचवा” असे घोषवाक्ये देत संपूर्ण गावात पर्यावरण जनजागृती केली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर आधारित गीत गायन सादर करून जनमानसात झाडांचे महत्त्व अधोरेखित केले. Tree planting and tree planting activities
गोवंश तस्करीची मोठी कारवाई, १७ वाहने तर २४ जणांना अटक
वृक्षदिंडीच्या समारोपानंतर गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. “एक झाड माझ्या आईच्या नावाने” या संकल्पनेतून प्रत्येकाने झाडे लावण्याची जबाबदारी स्विकारली.
कार्यक्रमास अतुल दादाजी धोटे (सरपंच), शिल्पा सुनिल जगताप (उपसरपंच) तसेच ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र कोगरे सर, शिक्षकवर्ग, अंगणवाडीतील बालकांसह संपूर्ण विद्यार्थी वर्गाने उत्साहाने सहभाग नोंदवला.

