Friday, April 17, 2026
HomeCulturalबाल सुशांस्कार शिबीरात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन...

बाल सुशांस्कार शिबीरात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन…

Health check-up camp organized at Bal Sushanskar Camp

कोरपना :- गडचांदूर येथे चालू असलेल्या बाल सुशांस्कार शिबीरात सोमवार दिनांक २७ मे २०२५ रोजी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्या CSR उपक्रमांतर्गत हे शिबीर घेण्यात आले. Health check-up camp organized at Bal Sushanskar Camp

या आरोग्य शिबिरात विविध वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीत डॉक्टरांनी मुलांच्या वजन, उंची, नेत्र तपासणी, त्वचा विकार, दातांची तपासणी आदी बाबींवर लक्ष केंद्रित केले. याशिवाय विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मूलभूत सल्लाही देण्यात आला.

या उपक्रमात सुमारे १०० हून अधिक बालकांनी सहभाग घेतला. सर्व मुलांनी भगव्या टोपी घालून एकसंधतेचे दर्शन घडवले. शिबिरामध्ये स्थानिक शिक्षक, पालक, स्वयंसेवक आणि आयोजक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिबिराचे आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी HPCL आणि आयोजक संस्थेचे आभार मानले. आरोग्य शिबीराच्या माध्यमातून मुलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular