Gondwana University issues show cause notice to professors who conduct honest examination work
चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा- 2025 या 21 एप्रिल 2025 पासून सुरू झाल्या असून सर्व परीक्षा केंद्रावर मुख्य पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक व बाह्य पर्यवेक्षक म्हणून अनेक प्राध्यापक ची नेमणूक झाली आहे. सदर पर्यवेक्षक दोन्ही पाळी मध्ये परीक्षा घेण्याचे कार्य प्रामाणिकपणे करीत असून परीक्षेच्या कार्यात व्यस्त असल्याने ते त्यांच्या विषयाच्या पेपर मूल्यांकना करिता जाऊ शकत नाही ही बाब लक्षात न घेता व शहानिशा न करता गोंडवाना विद्यापीठाने परीक्षा घेणाऱ्याच या प्राध्यापकांनाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, या पार्श्वभूमीवर गोंडवांना विद्यापीठ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे व सचिव डॉ. विवेक गोर्लावार यांनी कारणे दाखवा नोटीस रद्द करण्याच्या संदर्भात कुलगुरूंना निवेदन दिले असून करणे दाखवा नोटीस रद्द न केल्यास परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. Gondwana University issues show cause notice to professors who conduct honest examination work
गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेत अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक मुख्य पर्यवेक्षक व सहपरिवेक्षक म्हणून आपले प्रामाणिक कर्तव्य बजावीत आहे तसेच बहुतांश परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यासाठी बाह्य पर्यवेक्षक देखील रुजू असून सदर विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीत सुरू आहे. परीक्षा घेणारे सदर पर्यवेक्षक सकाळी 7.30 ते सांधकाळी 7.00 पर्यंत दोन्ही पाळीत परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याच्या कार्यात व्यस्त आहेत.
विद्यापीठाने नेमून दिलेल्या परीक्षेच्या कार्यात व्यस्त असल्याने सदर पर्यवेक्षकांना त्यांच्या विषयाच्या पेपरमूल्यांकनाकारीत केंद्रावर जाणे शक्य नाही मात्र कुठलीही शहनिशा न करता प्रामाणिकपणे परीक्षेचेच काम करणाऱ्या या पर्यवेक्षकांना मूल्यांकनासाठी न गेल्याचे कारण दाखवून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, हे अन्यायकारक असून ही बाब प्रामाणिकपणे परीक्षा घेणाऱ्या प्राध्यापकांना मानसिक त्रास देणारी ठरत आहे. Demand to cancel Gondwana Young Teachers Association’s show cause notice
या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने सदर पर्यवेक्षकांना दिलेली कारणे दाखवा नोटीस तात्काळ रद्द करण्याची मागणी केली असून न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.
