Saturday, April 26, 2025
HomeEducationalराष्ट्रीयकृत बँका, विमा कंपनी व आरसीएफ मधील ओबीसींचा नोकऱ्यातील अनुशेष आरक्षण धोरणानुसारच पूर्ण...

राष्ट्रीयकृत बँका, विमा कंपनी व आरसीएफ मधील ओबीसींचा नोकऱ्यातील अनुशेष आरक्षण धोरणानुसारच पूर्ण करा

Fill up the backlog of jobs of OBCs in nationalized banks, insurance companies and RCF as per the reservation policy.

Commission Chairman Hansraj Ahir’s instructions at the review meeting in Mumbai

चंद्रपूर / यवतमाळ :- विविध राष्ट्रीयकृत बँका, जीवन विमा कंपनी, रिझर्व बँक ऑफ इंडिया व केंद्रीय आस्थापनातील नोकर भरती, ओबीसी प्रवर्गातील कार्यरत कर्मचारी, अधिकारी, आरक्षण रोष्टर नुसार कार्यवाही यासह अन्य बाबींचा सविस्तर आढावा संबंधित आस्थापनाच्या आयोजित बैठकीमध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहात घेतला.

दि. ६ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने  घेतलेल्या बैठकीमध्ये बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्स्टिट्युट ऑफ पर्सोनेल ‍सिलेक्शन, युनियन बँक, एल. आय. सी., आर बी आय आदी आस्थापनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी एनसीबीसी अध्यक्षांना आवश्यक माहिती सादर केली. बँकांच्या नव्या नोकरभरती प्रक्रियेत निवड झालेले सुमारे ५० % उमेदवार नोकरीत रूजु होत नसल्याची बाब आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या गंभीर विषयात योग्य दक्षता घेत उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले. Fill up the backlog of jobs of OBCs in nationalized banks, insurance companies and RCF

सर्वच बँकांमध्ये ओबीसी आरक्षणाविषयी असलेल्या टक्केवारीची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नापसंती व्यक्त करून वरिष्ठांनी ओबीसी आरक्षणाविषयी काटेकोर धोरण स्वीकारण्यास प्राधान्य देण्याची सुचना केली. ओबीसी आरक्षणाचा बॅकलॉग त्वरीत भरण्याकरिता जलदगतीने कार्यवाही करावी अशा सुचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना आयोगाद्वारे देण्यात आल्या.

दि. ६ सप्टें. रोजी याच अतिथीगृहामध्ये आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आरसीएफ RCF Chemical Fertilizer Company या रासायनिक खत कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून तेथील पदभरती, रोष्टर नुसार ओबीसी आरक्षण OBC Reservation व अन्य बाबींचा सुध्दा सविस्तर आढावा घेतला. Commission Chairman Hansraj Ahir’s instructions at the review meeting in Mumbai

यावेळी अहीर यांनी कंपनीद्वारे सक्षम अधिकाऱ्यांकरवी ओबीसी आरक्षण रोष्टरचे पालन झाल्याचे अनुमोदन होईपर्यंत पुढील भरतीप्रक्रिया कार्यान्वित करू नये अशा सुचना केल्या. त्यांनी ओबीसी उमेदवारांच्या नोकरभरतीबाबत आरक्षण टक्केवारीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देतानाच तत्संबंधीचा अनुपालन अहवाल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला सादर करण्याची सुचना अहीर यांनी या आढावा बैठकीतून अधिकाऱ्यांना दिली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular