Monday, October 12, 2026
HomeMPनवरात्र विसर्जनासाठी २२ व २४ ऑक्टोबरला परवानगी द्या

नवरात्र विसर्जनासाठी २२ व २४ ऑक्टोबरला परवानगी द्या

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात सध्या आदिशक्तीच्या आराधनेचा पवित्र नवरात्रोत्सव अतिशय श्रद्धेने, उत्साहात आणि शांततेत पार पडत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग अहोरात्र घेत असलेली मेहनत कौतुकास्पद आहे. मात्र, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या अडचणी व लोकभावनांचा आदर करत २३ ऑक्टोबर रोजी होणारी निवडणूक वगळून २२ व २४ ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी चंद्रपूरच्या MP Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक SP यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. Grant permission for Navratri immersion on October 22 and 24!

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, या वर्षी नवरात्रोत्सवाच्या नवमी व दशमी तिथीला भाविकांचे उपवास असल्यामुळे, विसर्जन व महाप्रसादाचे आयोजन २१ ऑक्टोबर रोजी करणे अशक्य आहे. त्यामुळे विसर्जन २२ व २४ ऑक्टोबर दरम्यान करावे, असे बहुतांश मंडळांनी निश्चित केले होते. आगामी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मंडळांनी या नियोजनानुसार हजारो रुपयांची पूर्वतयारी, महाप्रसादाचे बुकिंग आणि साहित्याची व्यवस्था केली आहे. मात्र, अचानक २१ तारखेलाच विसर्जन करण्याचे निर्देश प्रशासनाकडून आल्यामुळे, आधीच आर्थिक ताण सहन करणाऱ्या सार्वजनिक मंडळांवर आणि भाविकांच्या श्रद्धेवर मोठा आघात झाला असून मंडळांसमोर अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे.

आगामी २३ ऑक्टोबर रोजी होणारी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचे महत्त्व मंडळांना पूर्णपणे ठाऊक आहे. पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आणि नागरिकांचे सहकार्य यात कधीही दुजाभाव राहिला नाही. परंतु, लोकभावना आणि श्रद्धा यांचा अचूक समतोल साधत, २३ तारखेचा निवडणुकीचा दिवस पूर्णपणे वगळून, मंडळांना २२ आणि २४ ऑक्टोबर या दोन दिवशी विसर्जन करण्याची सवलत अथवा परवानगी द्यावी, ही समस्त मंडळांची आणि नागरिकांची रास्त मागणी आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात अधोरेखित केले आहे.

पोलीस प्रशासनाने सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांना विश्वासात घेऊन, त्यांच्या या भावनिक व आर्थिक अडचणींचा अभ्यासपूर्ण व सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि २२ व २४ तारखेला विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. या प्रशासकीय निर्णयामुळे उत्सव अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात संपन्न होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular